Saturday, December 24, 2011

एका बापाचं आपल्या मुलीला लिहिलेलं पत्र शेवटच्या क्षणी......


माझ्या बाळा कशी आहेस ग तू ?

विसरलीस का ग ह्या बापाला, आठवण तरी येते का कधी ?

जेव्हा लहान होतीस ना नेहमी माझी वाट पहायचीस घरी यायची.

केव्हा तुझा बाबा तुला जवळ घेईल आणि तुझ्या बरोबर खेळेल,

आठवतं का तुला माझ्या हाताला हाथ धरून चालायला शिकली होतीस.

जेव्हा तू धडपडून पडायचीस तेव्हा तुला सावरणारा तुझा बाबा होता,

जेव्हा तुला थोडं जरी झखमा होईच्या ह्या बाबाला जास्त त्रास होईचा.

ऑफिस मधून लेट झालं तरी तू माझी यायची वाट पहायचीस

किती काळजी घ्याचीस आपल्या बाबाची, जेव्हा मी दुखात असायचो तेव्हा तू मला हिम्मत द्यायचीस.

तू तर माझ्यासाठी मुलगा होतीस जो नेहमी मला दुखासुखात आणि कठीण परीस्तीत माझी साथ देणार असं वाटायचं

पण तू एवढी बदलशील असं कधी वाटलं न्हवतं.

बगता बगता खूप मोठी झालीस आणि स्वतःचे निर्णय स्वताच घेयला लागलीस

वाटलं न्हवतं माझं बाळ आपल्या बाबाला आयुष भर त्रासात सोडून जाईल.

जेव्हा लहान होतीस ना तेव्हा तुझ्या लग्नाची स्वप्नं बगत होतो

पण तू असं करशील कधीच वाटलं न्हवतं.

अगं आजून तुझ्या लग्नाचे वय देखील न्हवतं,

अजून तुझे शिक्षण पण पूर्ण नाही झालं होतं,

कसा ग एवढा मोठा निर्णय घेतलास?

ह्या बाबाला एकटा का सोडून गेलीस ग

माझ्या स्वप्नांना तू फक्त स्वप्नात ठेवून गेलीस.

एकच तर इच्छा असते एका बापाची आपल्या मुलीचं कन्यादान करावा,

पण ते देखील तू हिरावून घेतलास.

ह्या बापाचा विचार नाही केलास निधान तुझ्या आईचा तरी विचार करायचा,

कशी विसरलीस ग त्या आईला जिने तुला ९ महिने पोटात ठेवलं,

किती सहन केलं असेल, त्या जन्मदात्या आईला देखील विसरलीस.

कसा ग तुझा काळजाला काय वाटलं नाही आपल्या आईवडिलांना दुखात सोडून जायला,

जेव्हा पासून गेली आहेस तेव्हा पासून काय काय सहन करतात तुझे आई बाबा माहिती तरी आहे का तुला,

तू काय मुलगा आवडलं म्हणून प्रेम केलस आणि नंतर लग्न केलस.

तुला फक्त एकच विचारयचे आहे ६ महिन्याच्या प्रेमासाठी तू 18 वर्ष ज्या आईवडिलांनी प्रेम दिलं त्यांना विसरलीस.

किती ग कठोर अशील एवढं आमचं प्रेम तुला कमी पडलं,

मला तर कधीच वाटलं न्हवतं माझं बाळ कधी आपल्या बाबा बरोबर असं करेल.

एकुलती एक होतीस तुला आमचं प्रेम कसं कमी पडलं तेच कळत नाही आजून

पण आता काय करणार तुला त्याच्याकडे जास्त प्रेम भेटतंय ह्या साठी थोडं मन खुश आहे

तू आयुष्भर खुश रहावं हीच ह्या बाबाची इच्छा पण तुला कधी माफी नाही भेटणार

कारण तू आपल्या बाबाला एवढं दुख दिलं आहेस ते कधीच नाही मिटणार

आणि तू माझ्या अंत क्षणाला देखील यायचं नाही

जर तू आलीस तर तुझ्या ह्या बापाच्या आत्मेला कधीच शांतता नाही भेटणार

ही तुला आयुष्यभराची शिक्षा समज कारण तू जे केलस त्यासाठी तुला कधी माफी नाही मिळणार

पण मी गेल्यानंतर तू घरी येऊन आईला भेटू शकतेस आणि नंतर तुलाच तिची काळजी घायची आहे

तेवढं तरी करशील ना माझ्या बाळा

तुझ्या आईला शेवट पर्यंत माझी कमी भासली नाही पाहिजे तेवढी तिला साथ दे

माझं स्वप्नं काय ह्या जन्मी पूर्ण नाही झालं

पण बाळ मला तुझ्याकडनं एक वचन हवं आहे

ह्या जन्मी जे झालं नाही ते मला फुडच्या जन्मी हवं आहे

मला फुढच्या जन्मी तूच माझी मुलगी हवी आहेस

आणि फुढच्या जन्मी जे माझं स्वप्न अधुरं राहिला कन्यादानाचा ते पूर्ण होईल

येशील ना ग माझी बाळ बनून परत

सावरशील ना ग ह्या बापाला आणि करशील ना आपल्या बापाची इच्छा पुरी

तुला बघण्याची खूप इच्छा होती पण मी घेतलेला वचन नाही तोडणार

तू जे केलस त्या साठी तुला ह्या जन्मी तरी कधीच माफी नाही मिळणार

माझी जायची वेळ जवळ आली आहे मी गेल्यानंतर आईला खुश ठेव बाकी मला काही नको

आणि तू आयुष्भर खुश रहा हेच देवाकडे मागणं



तुझा..........बाबा.





- समीर पेंडुरकर (घाडी)

Sunday, December 11, 2011

आहे एक मुलगी ...............तिच्या बोलण्याची वाट बघतोय

आहे एक मुलगी ...............तिच्या बोलण्याची वाट बघतोय



आहे एक मुलगी खूप छान मैत्रीण आहे माझी



माझ्याच Collegela होती



ती Second year ला आणि मी Last year ला होतो



तेव्हा फक्त तिला बघितलं होतं



ओळख दोघांची माझ्या ऑफिस मध्ये झाली



ती तिच्या कामाच्या निमिताने आली होती



तेव्हा पहिल्यांदा तिच्याशी बोलो होतो



कॉलेज मध्येच मैत्री करायची होती



पण बोलतात ना नशिबात जे असतं ते भेटतच



तो दिवस माझ्यासाठी तर न विसरण्यासारखा होता



मनात एवढच चाललं होता कि परत भेट होईल कि नाही



पण दूसऱ्या दिवशी चक्क तिने FB वर Friendship टाकली होती



मी लगेच तिला add केलं



मग काय रोज chatting करत रहायचो



खूप बोलतो आम्ही फक्त chat वरच



खूप चांगली Friendship झाली होती



खूप चांगली आहे ती



दिसायला जेवढी सुंदर तेवढीच मनाने सुंदर आहे ती



थोडीशी लाझ्री थोडीशी भावूक आहे ती



खूप काळजी करते माझी



एवढी काळजी करते कि आज पर्यंत कोणीच नाही केली



दोघे एकमेकांचा दुख सुख देखील वाटून घेय्चो



ती हसायची तेव्हा मी हसायचो



ती दुखत असेल तर मला सुधा दुख वाटायचं



पण तिला दुखात नाही बघू शकत म्हणून काहीही करून तिला हस्वायचो



माझ्यवर कितीहि रागावली तर स्वताच sorry म्हणून बोलायला येय्ची



आणि कधी मी रागावलो तर प्रेमाने मनवायची



आता हे प्रेम होता कि फक्त खास मैत्री काहीच समजत न्हवतं



पण एवढा खरं ती मला आवडते



पण तिच्या मनातला पण काही कळत नाही आहे ना



कधी कधी वाटतं तिचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे कधाचित माझ्याहून जास्त



का माहिती तिने मनात का सर्व लपवून ठेवला आहे



का एवढी तडपवून राहते आहे आणि मला देखील तेवढच तद्पाव्तेस



मनात काय असेल ते सांगत पण नाही



मी सांगितला असतं पण एकच भीती वाटते



एवढी चांगली मैत्री तुटेल जर तिच्या मनात असं काही नसेल तर



एवढच कारणासाठी मी घाबरतो नाहीतर कधीच सांगितलं असतं



आता काय करू कि ती स्वताहून काय तरी सांगेल



खूप त्रास होतोय पण काय करू, फक्त तिच्या बोलण्याची वाट बघतोय, वाट बघतोय , वाटच बघतोय



- समीर पेंडुरकर

ASEL KUNITARI..........